Type Here to Get Search Results !

धावत्या शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक; गुन्हा दाखल


 

पुणे, दि. 20 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): सिकंदराबाद - पुणे या धावत्या शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याने एका प्रवासी डब्ब्याची खिडकी फुटली असून सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

 

सोलापूर - दौंड - पुणे लोहमार्गावर १८ डिसेंबर रोजी भिगवण (ता. इंदापूर) व बोरीबेल (ता. दौंड) रेल्वे स्थानकाच्या दरम्यान शताब्दी एक्सप्रेसवर (क्रमांका १२०२६) ही दगडफेक करण्यात आली.

 

चार दिवसांपूर्वी थांबलेल्या काकीनाडा एक्सप्रेस मध्ये जबरी चोरी झाल्यानंतर ही दगडफेक झाली आहे. दगडफेकीमुळे सी - ३ या डब्ब्यातील खिडकी क्रमांक ५८ ची बाहेरील काच फुटली. तर आतील काचेला तडा गेला. महिला प्रवासी चंद्रकला यांचे त्या खिडकीजवळ आरक्षण होते परंतु सुदैवाने त्यांना किंवा इतर प्रवाशांना कसलीही इजा झाली नाही.

 

पुणे रेल्वे स्थानकात या बाबत तक्रार दाखल झाल्यानंतर सदर गुन्हा दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलीस ठाण्याकडे तपासाकरिता वर्ग करण्यात आला. त्यानुसार अज्ञाताविरूध्द रेल्वे कायदा कलम १५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच दौंड ते भिगवण दरम्यान पाहणी करण्यात आली परंतु लोहमार्ग किंवा परिसरात संशयित व्यक्ती आढळून आली नाही.


याआधी १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी पुणे - सोलापूर लोहमार्गावर बोरीबेल व मलठण (ता. दौंड) रेल्वे स्थानकांच्या दरम्यान काकीनाडा एक्सप्रेस थांबली असता त्यामधील तीन डब्ब्यांमध्ये जबरी चोरी झाली होती. काकीनाडा एक्सप्रेस मधील एका महिला प्रवाशाचे पावणे तीन लाख रूपयांचे दागिने लुटण्यात आले होते.

 

चार दिवसांपूर्वी सोलापूर - पुणे लोहमार्गावरील प्रवासी गाडीत जबरी चोरी झाली असताना शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याने रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांनी गस्त वाढविली आहे. सदर घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक व्ही. के. सोलंकी यांनी दिली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.