पुणे, दि. 27 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
होममिनिस्टर जबाब दो....अशा शब्दात आज खासदार
सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
दुसरीकडे केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांचे जाहिर आभार मानताना महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर
महाविकास आघाडीने वेळ मागितल्यावर शहा यांनी तातडीने वेळ दिला, इतकेच नाही तर
महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली,
दोन्ही मुख्यमंत्र्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. तरीही
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वक्तव्ये केली, हा अमित
शहा यांचा अपमान आहे.
शिवाय महाराष्ट्राच्या
विरोधात कोणीतरी मोठ षढयंत्र रचतंय, कोण हे करतंय याचा शोध घ्यावा लागेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. याचप्रकारचे त्यांनी अजून मांडलेले
मुद्दे असे आहेत-
· राज्याच्या विविध भागात होणारे हल्ले, महिलांवरील अत्याचार व विविध ठिकाणच्या कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती याबाबत गृहमंत्र्यांनी याचे उत्तर द्यायला हवे, हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे, नागपूरमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हजर असताना अनेक घटना घडतात. बारामती, पुणे, पालघर ठाण्यातही अनेक घटना घडल्या. मागच्या काळात ते गृहमंत्री असतानाही अशीच परिस्थिती होती. यासर्व बाबतीत प्रशासन व मंत्री काय करतात हा प्रश्न आहे.
· लोकसभेच्या
अधिवेशनात चीन तसेच कोविडवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती, दोन्ही विषयांवर केंद्राने चर्चा घेतली
नाही, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र व राज्याने काहीही
भूमिका घेतली नाही, ही बाबही या निमित्ताने समोर आली.
· अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, विरोधी पक्ष सातत्याने भूमिका मांडत आहे राज्य सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे, मुख्य विषयांना बगल देण्याचे काम सरकारकडून होत आहे. अनिल देशमुख यांच्या जामीनासाठी प्रयत्न सुरु असून न्यायालयाकडून नक्की न्याय मिळेल, असेही त्या म्हणाल्या.
·
जागतिक महामंदीची चिन्हे दिसत असताना त्याचा नक्कीच
काही परिणाम भारतावरही होणार आहे, या संदर्भात केंद्राची योजना तयार हवी ही
बाब आम्ही केंद्राला वारंवार सांगूनही काहीही होत नाही, अशी
टीका त्यांनी केली.
याशब्दांत बारामतीत
आज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत
बोलताना थेट फडणवीस यांनाच लक्ष्य केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84