Type Here to Get Search Results !

सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने गाठला ५०० भागांचा टप्पा.

 

पुणे, दि. 29 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य  पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहे.

 

आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. आता मालिकेत राजपुत्र कृष्णधर याचा चौरंगीनाथ होण्याचा प्रवास सुरू झाला आहे. मालिकेत लवकरच चौरंगीनाथ पाहायला मिळतील. राजपुत्राचा जन्म कसा झाला आणि त्यांचे चौरंगीनाथ हे रूपांतर कसे होणार, हे आपल्याला महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

 

गाथा नवनाथांची मालिका आता ५०० भागांचा टप्पा पार करत आहे. आत्तापर्यंतच्या नाथांचा प्रवास आणि पुढील वाटचाल यात मालिकेने ५०० भाग पूर्ण केले. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. 'गाथा नवनाथांची' या मालिकेच्या पुढील भागांत नाथ संप्रदायाची परंपरा पहायला मिळणार असून मालिकेत आता कोणते चमत्कार घडणार, नाथ अशुभ शक्तींचा नाश कसा करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

 

मालिकेने ५०० भागांचा टप्पा गाठला म्हणून सेट वर सेलेब्रेशन देखील करण्यात आले. त्या वेळी संपूर्ण टीम ने एकत्र येऊन ५०० भागांचा हा टप्पा एकत्रित रित्या साजरा केला. पाहा, 'गाथा नवनाथांची', सोम. ते शनि. संध्या. ६.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.