Type Here to Get Search Results !

पुरंदर-हवेलीवर आमदार संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळेंचा अन्याय; विजय शिवतारे यांचा घणाघात

 


पुणे, दि. 16 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील जनतेवर विकासकामांच्या बाबतीत फार अन्याय केला असल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. विकास प्रकल्प पुरंदर-हवेलीतून बाहेर ढकलण्यातच यांनी जास्त रस दाखविला.

 

जनतेच्या खर्‍या प्रश्नांकडे कानाडोळा केला असा आरोप करत शिवतारे यांनी त्यांना काही प्रश्न विचारले आहेत.

 

ते म्हणतात संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळे यांना या प्रश्नांची उत्तरे पुरंदर-हवेलीच्या जनतेला उत्तरं द्यावी लागतील.-

१.        पुरंदरचा प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ बारामतीला का पळवली होता ? हा पुरंदरच्या विकासाचा गेमचेजंर प्रकल्प आहे, हे माहीत असताना तो बारामतीकडे नेण्याचा प्रयत्न झाला,पुरंदरच्या जनतेच्या सुदैवाने सत्ताबदल झाल्याने हा बेत आता बारगळला आहे, नाहीतर हा प्रकल्प बारामतीत गेल्यात जमा होता.

 

२.       जलजीवन योजना केंद्र आणि राज्याची, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे आमदार, खासदारांचे पक्ष दोन्हीही ठिकाणी सत्तेत नाहीत. मग त्यांचे या कामात योगदान काय ? त्यांचे सरकार असताना निधी देत नव्हता, मग सत्तेतून बाहेर फेकल्यावर यांची कार्यक्षमता वाढली काय ?

 

३.       काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येताच पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत गुंजवणीचं पाणी बारामतीला पळविल्याचा निर्णय या दोघांच्या पक्षांनी घेतला नंतर गुंजवणी जलवाहिनीच्या कामाचा खोळंबा का झाला ?


 

४.      फुरसुंगी उरुळी पाणी योजनेसाठी 24 कोटी दिले नाहीत, मग बारामतीच्या एसटी स्टँडला 200 कोटी कसे दिलेत ?

 

५.       आपण सरकारमध्ये येताच विजेचा दर तिप्पट वाढवून शेतकर्‍यांचे 19 टक्के दराने मिळणारे पुरंदर उपसा व जनाईचे पाणी बंद का केले होते ?

 

६.       दिवे येथील राष्ट्रीय बाजार रद्द करून थेऊरच्या यशवंत कारखान्याच्या जागेत का पळवला होता ?

या प्रश्नांची उत्तरे संजय जगताप यांना द्यावी.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.