Type Here to Get Search Results !

पुणे एअरपोर्ट रोडवरील उड्डाणपुल कधी सुरु होणार? नागरिक वैतागले

 

पुणे, दि. 19 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): ६ महिन्याची दिलेली मुदतवाढ उलटून गेली तरीही येरवड्यातील गोल्फ क्लब चौकात तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलावर डांबरीकरण व रंगरंगोटीची कामे शिल्लक आहेतच. उड्डाणपूलाचे काम संपण्यास अखेर जी २०च्या मुहूर्ताची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

 

आता जानेवारी महिन्यात जी २०परिषद होणार असल्याने त्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यात जी २०होणाऱ्या या परिषदेत ३६ देशांचे सुमारे २५० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

 

येरवडा भागात संगमवाडी, किंवा पुणे शहरातून विमानतळाकडे तसेच नगर रस्त्याच्या दिशेने जाण्यासाठी व विमानतळ, विमाननगर व नगर रस्त्याने येणारे नागरिक पुण्यात येण्यासाठी गोल्फ क्लब चौकाचा वापर करण्यास प्राधान्य देतात.

 

या भागातील झोपडपट्टीतील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मोठा वळसा घालावा लागणार असल्याने त्यांनी पुलाच्या खालून पादचारी मार्गाची मागणी केली होती, त्यानुसार हा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला. पण या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने या भागातील वाहतूक ठप्प होत होती.

 

तसेच अनेकदा पुण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री यांच्यासह इतर व्हीआयपी व्यक्तींचा या रस्त्यावर प्रवास असताना चौकातील इतर रस्त्यावरची वाहतूक थांबवावी लागते. त्यामुळेही या भागात कोंडी होते. त्यामुळे गोल्फ क्लब चौकात उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला.

 

या कामासाठी ३१ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च मंजूर करून सप्टेंबर २०१९ मध्ये या पुलाचे काम सुरू केले. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर या चौकातील ७० टक्के वाहतूक कमी होईल असा दावा प्रशासनाने केला आहे. या पुलाचे स्थापत्य विषयक सर्व काम पूर्ण झाले आहे. शेवटच्या टप्प्यांतील डांबरीकरण, सुरक्षेसाठी उपाय योजना, रंगरंगोटी ही कामे राहिली आहेत.

 

हे ३० महिन्यात म्हणजे एप्रिल २०२२ मध्येच याचे काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. पण कोरोनामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. सप्टेंबर मध्ये काम पूर्ण होणे आवश्‍यक होते, पण डिसेंबर महिना अर्धा संपून गेला तरीही काम सुरूच आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लाग आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.