पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): प्रेमप्रकरणातून विवाहित तरुणाने नदीत उडी मारुन
आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात गेल्या महिन्यात घडली होती. लष्कर परिसरात
राहणाऱ्या तरुणाने १२ ऑगस्ट रोजी कल्याणीनगर ते आगाखान ब्रीज दरम्यान आत्महत्या
केली होती.
या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका
तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणाच्या आईने याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आत्महत्या केलेला तरुण हा विवाहित आहे. आरोपी तरुणी आणि तरुणाची मैत्री होती.
विवाहित असल्याची माहिती तरुणाने आरोपी तरुणीला दिली होती. तरुण आणि त्याच्या
पत्नीत दुरावा यावा म्हणून तरुणीने त्याच्या पत्नीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क
करून त्यांच्याविषयी माहिती दिली. तरुण एका खासगी कंपनीत काम करत होता. तेथे जाऊन
तरुणी त्याला त्रास देऊ लागली. मी सांगेल त्याप्रमाणे वागायचे, असे सांगून तिने
तरुणाला धमकावले होते.
तरुणीच्या त्रासामुळे तरुणाने कल्याणीनगर येथील पुलावरून
नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक
रवींद्र आळेकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84