Type Here to Get Search Results !

सातारा रस्त्यावर दोन ट्रकच्या अपघातात डीझेल टाकी फुटून दोन्ही ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी

 

पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने जाणार्‍या एका ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. यामुळे दोन ट्रक एकमेकांना धडकल्यामुळे एका ट्रकची डिझेल टाकी फुटली. त्यामुळे दोन्ही ट्रकला भीषण आग लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 8 जानेवारी 2023) 1 च्या सुमारास पुण्याहून सातारा रस्त्यावर खंबाटकी घाटातील दत्त मंदिरासमोर ट्रक नंबर जी.जे 27 एक्स 6199 या ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक समोरून जात असलेल्या एका ट्रकला धडकला. त्यावेळी एका ट्रकची डिझेल टाकी फुटली. अन आगीचा भडका उडाला. यात दोन्ही ट्रक जळून खाक झाले असून, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.

आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यामुळे पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने जाणारी वाहतुक थांबविण्यात आली असून, या महामार्गावरील वाहतुक बोगदा मार्गे वळविण्यात आली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.