पुणे, दि. 3 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): जांभुळवाडी येथील सिमेंट पाईप बनविणाऱ्या कारखान्यातील पाण्याच्या हौदात पडून एका २ वर्षाच्या मुलीचा मृत्यु झाला. ही घटना जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळील एके आर सीसी कंपनीत ३१ डिसेंबर 2022 रोजी दुपारी १२ वाजता घडली.
याप्रकरणी अश्रफ अली खान (रा. वारजे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विमलकुमार शिवशंकरलाल गौतम (वय २६, रा. जांभुळवाडी) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरी पुलाजवळ एके आर सीसी ही सिमेंट पाईप बनविणारी कंपनी आहे. पाईप बनविल्यानंतर ते भिजविण्यासाठी जमिनीलगत पाण्याचा मोठा हौद बनवलेला आहे. या पाण्याचा हौदात कोणी जाऊ नये, म्हणून कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे कारखान्याच्या आवारात राहणारे फिर्यादी यांची मुलगी सुरभी (वय २) ही या पाण्याच्या हौदात पडली.
हे पाहिल्यानंतर तिला तातडीने बाहेर काढण्यात आले. तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84