Type Here to Get Search Results !

पुण्यात २० वर्षीय तरुणाला चॅलेंज करून मारलं? अपघाताचा बनाव, खुनाचा गुन्हा दाखल

 

पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बुधवारी 4 जानेवारी 2023 ला ही घटना इंदापूर शहराजवळील सातपुते वस्ती कॅनल जवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका 20 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रणव नानासो करे (वय 20, रा. करेवाडी, ता. इंदापूर ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या संदर्भात मृत युवकाचा भाऊ प्रतिक नानासो करे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राजकुमार पवार, इरफान शेख (दोघेही रा. इंदापूर), फरदिन मुलाणी (रा. वडापूरी ता.इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 जानेवारी रोजी फिर्यादी हे घरी असताना दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान त्यांना राजकुमार पवार याचा फोन आला. त्याने तुझ्या भावाला आज आम्ही मारणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी सातपुते वस्तीवर अपघात झाल्याचा फोन आला. तिथे जाऊन पाहिले असता प्रणवची गाडी पडलेली होती. त्या ठिकाणी राजकुमार पवार व त्याचे मित्रही उपस्थित होते. त्यांनतर प्रणव यास दवाखान्यात उपचारासाठी नेल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, डॉक्टरांनी प्रणवला मृत झाल्याचे घोषित केले.

नंतर, इंदापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाल्यानंतर मृत युवकाच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. रात्री उशिरा राजकुमार पवार, फरदीन मुलाणी, इरफान शेख यांनी जुन्या भांडणाच्या रागातून जीवे मारल्याची फिर्याद दिल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे हे पुढील तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes       

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.