Type Here to Get Search Results !

२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन, जाणून घ्या त्याचं महत्त्व

 

पुणे, दि. 25 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचे (voting rights in democracy) महत्त्व काय आहे, तो हक्क बजावल्याने काय परिणाम होऊ शकतो, मतदारांची (voters) भूमिका कशी महत्त्वाची ठरु शकते याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. (Every year on 25th january National Voters Day is celebrated.)

 

सन 2011 पासून देशात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी सहसा विविध राजकीय पक्ष (political party) आणि केंद्र तसेच राज्य सरकारकडून (central and state government) अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. एक मतदार म्हणून देशातील नागरिकाला जेव्हा हा हक्क मिळतो, तेव्हा त्यासोबत एक जबाबदारीही येते, ती म्हणजे लोकशाही टिकवण्याची जबाबदारी (responsibility to preserve democracy). नागरिकांनी आपल्या मताचा योग्य प्रकारे वापर केला तर योग्य प्रतिनिधी निवडून जाऊ शकतात आणि त्या माध्यमातून लोकशाही बळकट होऊ शकते. मतदानाच्या हक्काचा वापर करत देशातील नागरिक त्यांच्या भविष्यासाठी योग्य अशा प्रतिनिधीची निवड करु शकतील.

 

जगातली सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही (indian democracy) व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्त्वाचं आहे हे या दिनाच्या निमित्ताने सांगितलं जातं. आपल्या देशात 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत (voters list) नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. धर्म (Religion), जात (caste), वर्ण (skin colour), संप्रदाय (Sect) अथवा लिंग (gender) या निकषांवर भेदभाव न करता कुणालाही हा अधिकार बजावता येऊ शकतो.

 

ज्या ठिकाणच्या मतदार यादीत मतदारांचं नाव आहे, तिथंच त्यांनी मतदान करणं अपेक्षित असतं. वास्तव्याचं ठिकाण बदलल्यास एखादा मतदार नव्या मतदाराच्या रुपात नव्या ठिकाणाहून मतदान कार्ड बनवून घेऊ शकतो. पण तत्पूर्वी त्यांनी जुन्या मतदार यादीतून नाव हटवणं अपेक्षित असतं. मतदान केंद्रापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी निवडणूक आयोगाकडून पोस्टल वोटींग अर्थात पोस्टाद्वारे मतदान करण्याची सोय करण्यात येते. यामध्ये निवडणूक प्रक्रियेती कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थेच्या सेवेतील कर्मचारी यांचा समावेश असतो.

 

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराबाबतची माहिती मिळवण्याचा अधिकार मतदारांना आहे. उमेदवाराची संपत्ती (candicate's wealth), गुन्हेगारी नोंद (criminal record), शैक्षणिक पात्रता (educational qualification) अशा संदर्भातील माहिती त्यांना मिळू शकते. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानंही स्पष्ट केला आहे.

 

'मतदानासमान दुसरे काहीच नाही, मी नक्कीच मतदान करणार' ही या वर्षीच्या मतदार दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना मतदारांना समर्पित असून त्यातून मतदानामुळे मिळालेल्या सामर्थ्याच्या माध्यमातून, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याविषयी प्रत्येकाची भावना आणि आकांक्षा प्रतीत होते.

 

निवडणूक प्रक्रियेचा उत्सव तसेच समावेशकता दर्शविण्याच्या उद्देशाने या दिनासाठी बोधचिन्ह तयार केले आहे. त्यामध्ये पार्श्वभूमीवरील अशोक चक्र जगातील सर्वात मोठ्या लोकशाही यंत्रणेचे प्रतिनिधित्व करत असून शाई लावलेल्या बोटाची प्रतिमा देशातील प्रत्येक मतदाराचा सहभाग दर्शविते. बोधचिन्हातील 'बरोबर'ची खूण मतदारांच्या माहितीपूर्ण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची निदर्शक आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.