Type Here to Get Search Results !

निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्र्यांची भेट

 


पुणे, दि. 31 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): अहंकाराचा त्याग करुन निरंकार प्रभूला हृदयामध्ये वसवून खरेखुरे मानवी जीवन जगावेअसे प्रतिपादन निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज (nirankari sadguru mata sudikshaji maharaj) यांनी औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी विभागात चालू असलेल्या महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने आलेल्या विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.

सदगुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की अहंकारामुळे मनुष्य स्वत:ला श्रेष्ठ मानत असतो आणि मनामध्ये भौतिक वस्तूंना ईश्वरापेक्षाही अधिक मौल्यवान मानत असतो. परिणामी तो जीवनाच्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ राहतो आणि खरेखुरे मानवी जीवन जगू शकत नाही. याउलट जर मानवाने ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराशी नाते जोडले आणि सदोदित ईश्वराची जाणीव ठेवली तर त्याचे जीवन मौल्यवान होऊन जाते.

सदगुरु माताजींनी पुढे सांगितले, की ज्याप्रमाणे एक थेंब जेव्हा सागराला मिळतो तेव्हा त्याला सागराची उपमा मिळते. तद्वत मनुष्य जेव्हा भ्रामक मीचे अस्तित्व सोडून देतो आणि ईश्वररूपी शाश्वत तूच्या प्रति समर्पित होतो तेव्हा त्याला ईश्वरस्वरूप झाल्याचा श्रेष्ठ दर्जा आपसूकच प्राप्त होतो. शेवटी, सदगुरु माताजींनी समजावले, की ज्याप्रमाणे साबण आणि पाणी यांची सोबत केल्याने मळलेले कपडे स्वच्छ होतात तद्वत परम पावन परमात्म्याशी नाते जोडून त्याच्याशी अभिन्नता प्राप्त केल्याने आपण अंतर्बाह्य निर्मळ होऊन जातो, ज्यायोगे आपल्या जीवनात सहजपणे आत्मिकता आणि मानवता यांचा संगम होतो.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी रविवारी संत समागमाला (sant samagam) सदिच्छा भेट दिली आणि सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले.

याप्रसंगी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी उदात्त कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, संत-महात्मा सदोदित मानवाच्या जीवनात शांतीसुखाची प्राप्ती व्हावी आणि त्यांचे कल्याण व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आज हे निरंकारी मिशन सुद्धा विश्वबंधुत्वाचे हेच उदात्त कार्य करत आहे. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, की महाडमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी निरंकारी भक्तांनी जे मदत कार्य केले होते ते खरोखरच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे. मिशनकडून कोविड दरम्यान सुद्धा कौतुकास्पद कार्य केले असून नैसर्गिक आपत्ती असो किंवा स्वच्छता अभियानासारखे सामाजिक उपक्रम असोत अनेक कार्यामध्ये हे मिशन आपले योगदान देत आहे.

याप्रसंगी मुख्यमंत्री महोदय यांसमवेत औरंगाबादचे (Aurangabad) पालकमंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumare) आणि मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.