पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी फाटा (ता. खंडाळा, जि. सातारा) ते भोर तालुक्यातील वरंधा घाटापर्यंतच्या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ‘ट्वीटर’च्या माध्यमातून दिली.
वरंधा घाटातून जाणारा लोणंद-शिरवळ-भोर-मंडणगड- पाचरळ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ‘865 डीडी’ वरील सेक्शन शिंदेवाडी फाटा (ता. खंडाळा) ते वरंधा घाटापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती या निधीतून करण्यात येणार आहे. हा रस्ता 57.45 किलोमीटर अंतराचा आहे आणि यासाठी 723 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नवीन रस्त्यासाठीचे काम पुढीलप्रमाणे होईल-
- रस्त्याचे एकूण काम- 57.45 किलोमीटर
- दोन लेनचा रस्ता- 55 किलोमीटर
- भोर शहरातील चार लेनचा रस्ता- 2.45 किलोमीटर
- मार्गासाठी लागणारे क्षेत्र- 105.442 हेक्टर
- सद्यःस्थितीत असलेले क्षेत्र- 95.279 हेक्टर
- अधिग्रहण करावे लागणार क्षेत्र- 10.14 हेक्टर
- सध्या असलेले मोठे पूल- 2
- आणखी नवे बांधणारे मोठे पूल- दोन
- आणखी नवे बांधणारे छोटे पूल- 20
या रस्त्यामुळे वरंधा घाटातून कोकणात जाण्याचा मार्ग सुखकर होणार आहे आणि अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे. तसेच, या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर टोलनाकाही होणार असल्यामुळे टोलही द्यावा लागणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली
हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर
चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84