पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात अलीकडे कोयता गँग दहशद माजवत असताना कुठे तरी रोड रोमियोचा प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या रोमियोची मर्यादाही तेवढ्या पुरती राहिली नसून आता एक हवस बनत चाली आहे.
असाच एक प्रकार पुण्यातील फुरसुंगी चौकात घडला. एका विधवा महिलेला एकाच कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्याने जुन्या ओळखीतून “तू माझ्यासोबत प्रेम करणार नसशील, तर मी तुझ्या घरी येऊन नातेवाईकांना सांगेन व तुझी बदनामी करेल,” अशी धमकी दिली. महिलेला जबरदस्तीने मिठी मारून लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच, फिर्यादीच्या कानाखाली मारून तिला शिवीगाळ केली आणि महिन्यातून 3 वेळा भेटण्याची अट घालत धमकी दिली. हा सर्व प्रकार 2018 ते 28 डिसेंबर 2022 या दरम्यान घडला.
या प्रकरणी संतोष चंद्रकांत काळभोर याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 32 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी पीडित महिलेच्या ओळखीचा आहे. ती पतीच्या निधनानंतर तो काम करीत असलेल्या ठिकाणी नोकरी करते. याप्रकरणी काळभोर याला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक उमरे यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84