पुणे, दि. 13 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): काल रात्री पुण्यात 2 ठिकाणी आग लागली होती.
पहिली, पुण्यातील नऱ्हे परिसरात भंगार सामानाच्या एका गोडाऊनला भीषण आग लागली होती. याठिकाणी अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्या ठिकाणी अग्निशामक केंद्राचे जवान बराच वेळ प्रयत्न करत होते पण आग नियंत्रणात येत नव्हती. तीव्र आगीचे लोट वर पर्यंत जात होते. पाणी मारूनही त्यावर काही फायदा होत नव्हता. अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरुच होते. अखेर अनेक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाला पहाटे चार वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
त्याच वेळी दुसरीकडे पुण्यातील सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ रात्री 12 वाजण्याच्या सुमारास MNGL कंपनीची गॅसची पाईपलाईन फुटली. अचानक गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर ही आग पसरतच गेली. आगीमुळे एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग तिन्ही बाजूला पसरल्याने ती विजवण्यासाठी अग्निशामक दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84