Type Here to Get Search Results !

सिंहगड रोडवर पुन्हा कोयते व लोखंडी रॉडने किराणा दुकानदाराला धमकावत तोडफोड

 

पुणे, दि. 5 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सुट्टे पैसे न दिल्याच्या रागातून खानापूर (ता. हवेली) येथे सराईत गुन्हेगारांनी कोयते व लोखंडी रॉडने किराणा दुकानदाराला धमकावत तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रितेश भोसले (वय 23, रा. खानापूर) या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि इतर पाच ते सहा आरोपी फरार झाले आहेत.

 

चेतन संभाजी जावळकर यांचे खानापूर येथे गोकुळ सुपर मार्केट या नावाने किराणा मालाचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी एक आरोपी पाचशे रुपये सुट्टे मागण्यासाठी आला असता चेतन जावळकर त्याला सुट्टे पैसे नाहीत असे म्हणाले होते. तेव्हा आरोपी ‘तुला दाखवतो’ म्हणून निघून गेला.

 

दि. 3 जानेवारी 2023 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास रितेश भोसले व इतर पाच ते सहा जण हातात कोयते, रॉड, दारुच्या बाटल्या घेऊन जावळकर यांच्या दुकानासमोर गेले. आरोपींनी किराणा दुकानातील कामगार सुराराम चौधरी याला धमकावत दुकानातील काचा व शटरची तोडफोड केली.

 

चेतन जावळकर यांनी याबाबत हवेली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह खानापूर येथे दाखल झाले होते. यातील मुख्य आरोपी रितेश भोसले याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. यात काही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती हवेली पोलीसांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे याबाबत अधिक तपास करत आहेत.

 

झपाट्याने वाढत असलेले शहरीकरण आणि त्यामुळे वाढलेली स्थलांतरित मजुरांची संख्या यांमुळे हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. खुन,खुनाचा प्रयत्न, चोरी, दहशत निर्माण करणे, बेकायदा घातक शस्त्रे बाळगणे अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग दिसून येत आहे. नशेच्या आहारी जाऊन अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चिंताजनक वास्तव दिसत आहे. कायद्यातील तरतुदींमुळे असे अल्पवयीन गुन्हेगार सुटत असल्याने काही गुन्हेगारी टोळ्या जाणीवपूर्वक त्यांचा वापर करत आहेत. त्यामुळे अशा अल्पवयीन गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.