Type Here to Get Search Results !

आशा वर्कर कडून कामाची अपेक्षा कशी होणार पूर्ण?; शहरातील तब्बल पंचाहत्तर टक्के पदे रिक्त

 

पुणे, दि. 24 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शासन आणि प्रशासनाने आरोग्यविषयक (health) घेतलेल्या निर्णयाची स्थानिक पातळीवर अंमलबजाणी होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आशा वर्करची (asha worker) शहरातील तब्बल पंचाहत्तर टक्के पदे रिक्त आहेत.

 

राज्य शासनाने आणि महापालिकेने घेतलेल्या आरोग्यविषयक विविध निर्णयांची, उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे काम आशा वर्करच्या माध्यमातून केले जाते. कोविड (covid) काळातही वस्त्यांमध्ये जाऊन सर्वे करण्यासह लसीकरणामध्येही (covid vaccination) आशा वर्करचे काम उल्लेखनीय राहिले आहे. परंतु 25 टक्के आशा वर्करच कामाचा भार वाहत असल्याने रिक्त पदे (vacant seats) भरण्याची मागणी केली जात आहे.

 

स्तनदा मातांची तपासणी (lactating mothers examination) करणे, लहान मुलांच्या लसीकरणाच्या (child vaccination) नोंदी ठेवणे, पूर्व-प्रसूती (prenatal) झालेल्या व कमी वजनाच्या बालकांची माहिती ठेवणे, रुग्णालयातच प्रसूती (birth) होण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती (awarness) करणे, गर्भवती महिलांचा आत्मविश्वास वाढवणे, नवजात बालकांना होणार्‍या आजारांची (new born baby illness) माहिती घेणे व त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, घरोघरी जाऊन विविध प्रकारचे सर्वे करणे, कुष्ठरोग (leprosy), क्षयरोगाचे (Tuberculosis) रुग्ण शोधणे, गोळ्या औषधांचे वाटप करणे (medicines distribution) आदी कामे आशा वर्करच्या माध्यमातून केली जातात.

 

“राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात 1 हजार नागरिकांमागे एक याप्रमाणे आशा वर्करची पदे मंजुर झालेली आहेत. परंतु, अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी आम्ही वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.” असे राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे (asha volunteering team) उपाध्यक्ष नीलेश दातखिळे म्हणाले.

 

या कामासाठी आशा वर्कर जेवढे जास्त काम करतील, तेवढे जास्त मानधन (monetary benefits) मिळते. हे मानधन मासिक 3 हजारांपासून 15 हजारांपर्यंत असते. पुणे शहरात 40 टक्के भाग झोपडपट्टयांचा असल्याने एक हजार नागरिकांमागे एक याप्रमाणे आशा वर्करची पदे मंजुर आहेत. पुणे शहरात 1 हजार 124 आशा वर्करची पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात 298 आशा वर्करच काम करतात. जवळपास 74 टक्के पदे रिक्त आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.