पुणे, दि. 11 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नवीन बदली धोरणानुसार राज्यातील संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधील मिळून एकूण 10090 शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. नवीन बदली धोरणानुसार झालेली ही पहिलीच बदली प्रक्रिया आहे.
या बदल्यांमुळे तीन वर्षाच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. यापैकी पहिल्या वर्षी शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द केल्याने तर, त्यानंतरचे दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविता आली नव्हती.
एकूण बदल्यांमध्ये संवर्ग एकमधील 6690 आणि संवर्ग दोनमधील तीन हजार 400 शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, आणखी तीन आणि चार या दोन संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या बाकी आहेत. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील 641 शिक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बदल्यांमध्ये संवर्ग एकमधील 388 तर, संवर्ग दोनमधील 253 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
नव्या धोरणानुसार एकाच शाळेवर किमान पाच वर्षे शिकवलेल्या शिक्षकांना या बदली प्रक्रियेत सामावून घेण्यात आले. तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण 27 फेब्रुवारी 2017 ला आणले होते. या धोरणानुसार राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निर्णयाला शेकडो शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु सरकारने त्यात बदल केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले.
नवीन महाविकास आघाडी सरकारने शिक्षक बदल्यांचे जुने धोरण बदलून शिक्षकांसाठी फायदेशीर ठरणारे, नवीन धोरण अमलात आणले होते. यासाठी पुणे जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती 4 फेब्रुवारी 2020 ला स्थापन केली होती.
या समितीने केलेल्या शिफारशींनुसार हे नवीन बदली धोरण अस्तित्वात आले आहे. सर्वाधिक बदल्या झालेले जिल्हे पुणे, नगर, यवतमाळ, नाशिक, सातारा, औरंगाबाद, बीड हे आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84