हे पाहुणे येणार असल्याने लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील पादचारी मार्ग, दुभाजक स्वच्छ करून त्यांना रंग देणे, राडारोडा उचलणे, विद्युत खांब काढून टाकणे, चांगल्या खांबांना रंग देणे, कचरा उचलणे, रस्त्याची दुरूस्ती अशी कामे केली जात आहेत.
या परिषेदसाठी शहरात रंगरंगोटी, स्वच्छता सुरू असताना अनेक बेशिस्त नागरिक गुटखा, पान खाऊन पादचारी मार्ग, दुभाजकांवर पचापच थुंकून शहर घाण करत आहेत. त्यामुळे अशी ठिकाणे स्वच्छ करता करता नाकी नऊ आले आहे. अखेर प्रशासनाने कडक भूमिका घेत अशा बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक करावाई करत 1,23,000 रुपयांचा दंड वसूल केला.
संचेती चौकात तर माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगणाऱ्या नागरिकाला त्यांने थुंकून घाण केलेली जागा स्वच्छ करायला लावून चांगलीच अद्दल घडवली. या रस्त्यावर परदेशी पाहुण्यांना कुठेही घाण दिसू नये यासाठी ‘जी 20’चे फ्लेक्स किंवा हिरव्या रंगाचे कापड लावून अशा जागा झाकल्या जात आहेत.
महापालिकेने दुभाजक, चौकांचे सुशोभीकरण केले आहे. नव्याने रंग लावल्यानंतर वाहनचालक गुटखा, पान खाऊन रस्त्यावर थुंकत आहेत. अनेक जण दुभाजकावर पिचकाऱ्या मारत असल्याने हे स्वच्छ केलेले रस्ते, चौक पुन्हा घाण झाले आहेत. ‘जी 20’ परिषद अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना स्वच्छता राखण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे राहिले आहे.
नागरिकांना आवाहन करूनही थुंकण्याचा प्रकार कमी होत नसल्यामुळे गेल्या तीन दिवसात 123 जणांवर कारवाई करून 1,23,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामध्ये 10 जानेवारी रोजी 23 जणांकडून 23,000 रुपये , 11 जानेवारी रोजी 29 जणांकडून 29,000 रुपये आणि आज (गुरवारी) 71 जणांकडून 71,000 रुपये असा एकूण 1,23,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
“शहरात ‘जी 20’ परिषदेची तयारी सुरू आहे. शहर स्वच्छ करत असताना काही नागरिक थुंकून घाण करत आहेत. अशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जे नागरिक दंड भरणार नाहीत, त्यांना थुंकलेले पुसायला लावले आहे. गेल्या तीन दिवसात 123 जणांकडून 1,23,000 रुपयांचा दंड वसूल केला.” असे घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत म्हणाल्या.
संचेती चौकात घनकचरा विभागाचे कर्मचारी कारवाई करत असताना एका नागरिकाने रस्त्यावर थुंकले. त्यावेळी त्याला 1000 रुपयांचा दंड भरण्यास सांगितले, पण त्याने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगत दंड भरण्यास नकार देत. त्या नागरिकाला त्याने थुंकलेली घाण स्वच्छ करायला लावली. अशा प्रकारे शहरात इतर ठिकाणीही दंड न भरणाऱ्या नागरिकांना पुसायला लावले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84