Type Here to Get Search Results !

मागील दोन वर्षांपासून किताबासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या अमरावतीच्या माऊली जमदाडेला पुन्हा एकदा अपयश

 

पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मागील दोन वर्षांपासून किताबासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या अमरावतीच्या माऊली जमदाडेला पुन्हा एकदा अपयश आले. येथे सुरु असलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माऊलीला आपलाच सराव सहकारी सिकंदर शेखकडून गुणांवर पराभव पत्करावा लागला.

कोथरुड परिसरात खास उभारलेल्या स्व. मामासाहेब मोहोळ कुस्ती मैदानावर या लढती सुरू आहेत. यंदाच्या संभाव्या विजेतेपदाच्या शर्यतीत सिंकदर आणि माऊलीला समान संधी होती. कोल्हापूरला गंगावेस तालमीत एकाच वस्तादाकडे सराव करणाऱ्या या दोन मित्रांमधील लढतीची सुरुवात आक्रमक झाली. दुहेरीपटाचा डाव करत माऊलीने पहिल्याच प्रयत्नांत एकत्रित चार गुणांची कमाई करून चुणूक दाखवली. माऊली सातत्याने दुहेरी पटाचा डाव खेळण्याच्या तयारीत दिसल्यावर सिकंदरने बचावात्मक पवित्रा घेत त्याच्या डावाला प्रतिडावाने उत्तर दिले. माऊलीवर ताबा मिळवत सिंकदरने आपली गुणसंख्या वाढवत अखेरचे मिनिट असताना आघाडी मिळवली आणि नंतर ती टिकवून ठेवत आपल्या किताबी मोहिमेचा यशस्वी श्रीगणेशा केला.

माजी विजेता हर्षवर्धन सदगीरनेही विजयी सुरुवात करताना नगरच्या सुदर्शन कोतकरला गुणांवर पराभूत केली. केसरी गटातील आजच्या पहिल्या फेरीत फारसे धक्कादायक निकाल लागले नाहीत. कल्याणचा नरेश म्हात्रे, नागपूरच्या राकेश देशमुख, माती विभागात कोल्हापूरच्या शुभम शिदनाळे यांनी विजयी सलामी दिली.

अन्य लढतीत 57 किलो वजनी गटाच्या माती विभागात सोलापूरच्या सौरभ इंगवेने सुवर्णपदक, सांगलीच्या रोहित तामखेडेने रौप्य तर पुणे जिल्हा संघाच्या ओमकार निगडेने कांस्य पदक पटकावले. गादी विभागात बीडच्या आतिश तोडकरने सुवर्णपदक, कोल्हापूरच्या सुरज अस्वलेने रौप्यपदक तर कोल्हापूरच्या अतुल चेचर व पुण्याच्या विजय मोदर यांना कांस्य पदक विभागून देण्यात आले.

86 किलो गटात गादी प्रकारात पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगतापला सुवर्ण, तर उस्मानाबादच्या मुंतजीर सरनौबतला रौप्य तर सोलापूर शहरच्या एकनाथ बदरे व सतारच्या विजय डोईफोडे याना कांस्य पदक विभागून देण्यात आले. 86 किलो माती विभागात भांडारा जिल्ह्याच्या अर्जुन काळेला सुवर्णपदक, वाशीमच्या सचिन पाटीलला रौप्य तर सोलापूर जिल्ह्याच्या राहुल काळेला रौप्यपदक देण्यात आले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.