Type Here to Get Search Results !

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात फळ आणि भाज्यांची आकर्षक आरास

 

पुणे, दि. 7 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दत्तमंदिरामध्ये ३५ प्रकारच्या फळ आणि भाज्यांचा वापर करुन आरास साकारण्यात आली.

 

श्री म्हसोबा देवस्थान खारावडेच्या अध्यक्षा मधुरा व मुकुंद भेलके यांच्या हस्ते सजावटीचे अनावरण झाले. मटार, पालक, गाजर, मुळा, टोमॅटो, लसूण, बटाटे, कणीस यांसारख्या भाज्यांसह द्राक्ष, डाळींब, संत्रे, खरबूज, कलिंगड आणि सफरचंदासारख्या अनेक फळांची आकर्षक आरास लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आली होती.

 

फळ, भाज्यांवर कोरलेल्या नक्षीदार मूर्ती मोबाईल कॅमे-यामध्ये टिपण्याचा मोह यावेळी अनेकांना झाला. विविध प्रकारच्या भाज्यांनी सजलेले मंदिरातील खांब, विविधरंगी फळांचे तोरण आणि कळसापासून पायथ्यापर्यंत लावलेला ऊस असे मनोहारी दृश्य देखील भाविकांना पहायला मिळाले.

 

अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले,“प्राचीन काळी पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता. तेव्हा या संकटातून बाहेर येण्याकरीता ॠषीमुनींनी देवीची आराधना केली. त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पृथ्वीवरील दुष्काळ दूर केला, सगळीकडे सुखसमृद्धी नांदू लागली. त्यामुळे अन्नदात्या शाकंभरी देवीचे पूजन केले जाते. याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठी आरास करण्यात आली.

 

श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थानचे विश्वस्त रवींद्र शेडगे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपव्यवस्थापक (प्रशासन) समीर व गीता रजपूत यांच्या हस्ते दत्तयाग पार पडला.

 

ही सजावट शनिवार, दिनांक ७ जानेवारी 2023 पर्यंत भाविकांना पाहण्यास खुली राहणार आहे. मंदिराच्या मुख्य गाभा-यासह कळसापासून पायथ्यापर्यंत ही आरास करण्यात आली आहे. फळ-भाज्यांमध्ये नक्षीकामाने साकारलेल्या विविध मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच भाज्यांची आगळी-वेगळी रांगोळी पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.