Type Here to Get Search Results !

वारजे रामनगर पोलीस चौकीजवळील गुन्ह्यात जप्त केलेल्या दुचाकी पेटल्या? पोलिसांकडे नव्हती साधी अग्निरोधक यंत्रणा?

 


पुणे, दि.१० जानेवारी २०२३ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी पोलीस स्टेशन अंकित असलेल्या वारजे रामनगर पोलीस चौकी जवळ लावण्यात आलेल्या सहा दुचाकींना आग लागण्याची घटना आज दुपारी घडली. सुदैवाने वारजे मधील कै.वसंतराव अर्जुन चौधरी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

 

आज मंगळवार दि.१० जानेवारी २०२२ दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास रामनगर चौकीजवळ लावण्यात आलेल्या दुचाकींना आग लागल्याची घटना घडली. यावेळी कै.वसंतराव अर्जुन चौधरी अग्निशमन दलाचे वाहनचालक गौरव बाठे यांनी रामनगर हा झोपडपट्टीचा भाग असल्याने लागलेल्या आगीचे गांभीर्य ओळखत, वेगाने गल्लीबोळातील रस्त्यांमधून घटनास्थळी पोचत आग नियंत्रण आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. तर तांडेल राजेंद्र पायगुडे, अग्निशमन जवान जयेश लबडे, निलेश तागुंदे, अतुल नागवडे आणि गोविंद केंद्रे यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

 

या दुर्घटनेत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या या दुचाकी गुन्ह्यातील होत्या का चोरीच्या होत्या? याबाबत माहिती स्पष्ट झाली नसली तरी, या गाड्या बरेच दिवसांपासून येथे धूळ खात पडलेल्या असल्याचे समोर येते आहे. मात्र त्याचवेळी एक गंभीर बाब समोर आली असून, वारजे रामनगर पोलीस चौकीमध्ये अशा पद्धतीने आग लागल्यास, त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी फायर एक्सटिंग्विशर अर्थात अग्निरोधक सिलेंडर अथवा कोणतीही अग्निरोधक यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. किंबहुना कोणत्याच पोलीस चौक्यांमध्ये अशा महत्वाच्या यंत्रणा नसल्याचे समोर येत असून, चौक्यांमधील महत्वाची कागदपत्रे धोक्यात असल्याचेही यातून समोर येते आहे. त्यामुळे अशा घटनेतून बोध घेऊन, यंत्रणा काही कार्यवाही करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.