पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्याने घोलप ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 55 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चंदेरे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार, हर्षवर्धन मानकर, प्राचार्य डॉ. सातव जी. पी., डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. श्रीनिवास इपलपल्ली, डॉ. अशोक शेळके, प्रा. प्रिया आरडे, डॉ. सपना राणे, प्रा. गौरी मारणे, प्रा. प्रकाश हुंबाड, डॉ. योगेश पवार, प्रा. संतोष मोरे, प्रा.प्रियांका जाधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुनील चांदेरे म्हणाले रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले.
एल. एम. पवार म्हणाले ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
रक्तदान शिबीराचे आयोजन प्राचार्य डॉ. सातव जी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीनिवास इपलपल्ली, डॉ. अशोक शेळके, प्रा. प्रिया आरडे, प्रा.गौरी मारणे, प्रा.प्रियांका जाधव, डॉ. प्रकाश हुंबाड, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आदिनाथ पाठक, गणेश साबळे, विद्यार्थी प्रतिनिधी सुरज शिराळे यांनी केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84