पुणे, दि. 11 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): चोरट्यांनी एका सराफा व्यापाऱ्याच्या दुकानाच्या भिंतीला पाठीमागून भगदाड पाडत आतमध्ये प्रवेश केला. तिजोरीचा लोखंडी दरवाजा गॅस कटरच्या साहाय्याने कापून आतील 8 लाख 27 हजार 670 रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (दि. 9 जानेवारी 2023) पहाटेच्या सुमारास अंबड शहरातील सराफा मार्केटमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड शहरातील शहरात सराफा मार्केटमध्ये मयूर औदुंबर बागडे यांचे सराफा दुकान आहे. व्यापारी मयूर बागडे यांना सोमवारी पहाटे जाग आली. त्यांनी दुकानातील सीसीटीव्हीच्या हालचाली मोबाइलवर पाहिल्या. परंतु, सीसीटीव्ही बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला. लोखंडी दरवाजा गॅस कटरच्या साहाय्याने कापला. तसेच तिजोरीचा दरवाजाही गॅस कटरने कापून आतील सोन्या-चांदीचे 8 लाख 27 हजार 670 रुपयांचे दागिने लंपास केले. यात चेन, सोन्याचे पेंडल, चांदीची चेन, कडे, जोडवे आदी दागिन्यांचा समावेश आहे.
या प्रकरणात मयूर बागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, पी. एस. आय योगेश चव्हाण, आदिनाथ ढाकणे आदींनी सोमवारी घटनास्थळाला भेट दिली.
घटनास्थळाचा पंचनामा करतेवेळी पोलिसांना दुकानाच्या मागील बाजूस दोन मोठे गॅस कटर, एक लहान गॅस सिलिंडर, गॅस कटर, लोखंडी रॉड, दोन लोखंडी गिरमीट, काणस व इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे.
त्यांनी तत्काळ सतर्कता बाळगून पोलिसांना माहिती दिली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मोहम्मद युसूफ अली हयात अली (रा. लकरी टोला अमनत दिआरा, जि. साहेबगंज) याला ताब्यात घेतले. इतर तिघे मात्र पळून गेले. तपास स. पो. नि सोमनाथ नरके करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84