Type Here to Get Search Results !

CKY आणि KKY कडून नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; पुण्यात गुन्हा दाखल

 

पुणे, दि. 20 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांना पॅकेज घेण्यास भाग पाडून कोणतेही प्रशिक्षण न देता अनेक तरुणांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 19 वर्षाच्या तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Many youths were cheated by forcing them to take the package with the lure of a job without any training.)

याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी सी.के.वाय. व के.के.वाय. कंपनीचे कर्मचारी चंदनकुमार यादव आणि कुंदनकुमार यादव व इतर (डेक्कन हाईटस, डेक्कन जिमखाना) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याला एका महिलेला 24 डिसेंबर 2022 रोजी फोन आला. तिने नॅसविझ कंपनीबाबत माहिती देऊन नोकरी करायची असेल तर डेक्कन जिमखान्यावरील कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानुसार हा तरुण कंपनीत गेला. त्याला कंपनीत 10 ते 12 हजार रुपये प्रति आठवडा पगार मिळेल, असे सांगितले. त्यांची तीन पॅकेजस आहेत. त्यापैकी कोणतेही एक पॅकेज घेऊन तुम्हाला कंपनीत भरती झाल्यानंतर या पॅकेजेसचे मार्केटिंगचे काम करावे लागेल, असे सांगितले.

त्यानंतर त्यांना 14,500 रुपये अॅडव्हान्सही भरायला सांगितले. तेवढे पैसे नसल्याचे सांगितल्यावर तुम्ही आता कंपनीचे मेंबर झाले आहात. त्यामुळे तुम्हाला पैसे भरल्याशिवाय येथून जाता येणार नाही, असे सांगून त्यांना बसवून ठेवले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेले 10,500 रुपये भरले. उरलेले पैसे दोन दिवसात भरा, असे सांगून त्यांचे आधार कार्ड घेतले. त्यांना पैसे भरल्याची पावतीही देण्यात आली नाही.

त्यानंतर ते उरलेले 4000 रुपये भरण्यासाठी गेले असताना नॅसविझ या कंपनीच्या पत्त्यावर सी.के.वाय. एंटरप्रायझेस या नावाचे कार्यालय दिसले. त्यांनी तेथील व्यक्तीकडे पैसे भरले. त्यांना बेसिक ट्रेनिंग दिले जाईल, उद्यापासून या असे सांगण्यात आले. त्यानंतर ते 5 ते 10 जानेवारी रोज दुपारी 12 ते 4 जात होते. परंतु त्यांना कोणतेही ट्रेनिंग देण्यात आले नाही. त्यांच्याप्रमाणेच इतरांना नोकरी देण्याच्या नावाखाली पॅकेजचे पैसे घेऊन कार्यालयात बसवून ठेवले जात असल्याचे त्यांना आढळून आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी डेक्कन पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.