पुणे, दि.10 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): एरवी जास्त थंड असलेल्या महाबळेश्वरपेक्षा सोमवारी पुणे जास्त थंड होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यात रविवारपासून थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. रविवारी 13 अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान अवघ्या काही तासांतच 8.6 अंश सेल्सिअस एवढे खाली घसरले.
शहर व जिल्ह्यात काही तासांत 5 अंश सेल्सिअसने किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडीत अचानक वाढ झाली आहे. ही कडाक्याची थंडी असून, सर्वच भागात अखेर शेकोट्या पेटल्या तसेच नागरिकही उबदार कपडे घालून घराबाहेर पडले असल्याचे दिसून आले.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्याच्या सर्वच भागात मागील आठवड्यापासून ते अगदी शनिवार रविवारपर्यंत किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. तर कमाल तापमान 30 ते 33 अंशांवर पोहचले होते. अगदी रविवारी देखील शहराचे किमान तापमान 13.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. मात्र, रविवारी रात्री अचानक त्यामध्ये घट होऊन ते 8.6 अंश सेल्सिअस एवढे खाली घसरले.
अवघ्या काही तासातच किमान तापमानात 5 हून अधिक अंश सेल्सिअसने घट होऊन ते 8.6 अंश सेल्सिअस वर पोहोचल्याने शहरात रविवारी मध्यरात्रीपासून जोरदार थंडी वाढली. सोमवारी दिवसभर शहरात चांगले ऊन पडलेले असुनही चांगलाच गारवा जाणवत होता. त्यामुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे उत्तर भारतात शीतलहर आली आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे शहर व परिसरात थंडी वाढली. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात आठवडाभर थंडीचा कडाका जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना उबदार कपडे घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हंगामातील सर्वांत कमी 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद यावेळेस झाली आहे. एका दिवसात 5 अंशांने किमान तापमान घटले. गारठा आणखी वाढणार असल्याची शक्यता दर्शविली जात आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84