पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): ग्रामपंचायत निवडणुकीत केलेला निवडणूक खर्च पुढील 9 दिवसांत सादर न केल्यास निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने मंगळवारी (दि.10 जानेवारी 2023) दिला.
जिल्ह्यात नुकतीच 221 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत सदस्यपदांसह थेट सरपंच पदाच्या 2074 जागांसाठी 3532 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच, 761 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
ज्या उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब अद्याप सादर केला नाही, त्यांनी तातडीने सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.
या निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण 4293 उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब 20 जानेवारीपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी किंवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह सदर करावा. सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
त्यामुळे सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या 4293 जणांची निवडणूक खर्चाच्या हिशोबाचे आकडे जुळवताना दमछाक होत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84