Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा

 

पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि 15000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी हा आदेश दिला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अनुराधा भोसले यांनी केला. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी पाहिले. पोलीस कर्मचारी नीलेश पुकाळे, के. आर. रेणुसे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मुलगा 9 वर्षांचा होता. मुलाचे वडील डॉक्टर असून त्यांचा दवाखाना आहे. त्या दवाखान्यात आरोपी कर्मचारी होता. मुलगा अधूनमधून वडिलांच्या दवाखान्यात जात असे. आरोपीने त्याच्याशी जवळीक साधून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. तसेच ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.

घरी आल्यावर मुलगा घाबरलेला असल्यामुळे त्याच्याकडे त्याच्या आईने चौकशी केली. त्यावेळी त्याने घडलेली घटना त्याच्या आईला सांगितली.

त्यानंतर मुलाच्या आईने आरोपी विरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा निष्पन्न झाल्यामुळे दोषारोप पत्र दाखल केले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.