Type Here to Get Search Results !

तरुण पिढी म्हणजे बांधकाम क्षेत्राचे उज्ज्वल भवितव्य: सतीश मगर

 

पुणे, दि. 30 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): "तरुण पिढीचा बांधकाम क्षेत्रातील सक्रिय सहभाग आश्वासक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कुशाग्रतेने वापर ही या पिढीची सर्वात जमेची बाजू असून यामुळे सकारात्मक बदल बांधकाम क्षेत्रात होताना दिसत आहेत. आधुनिकता आणि पारंपारिकता यातील उत्तम दुवा साधणारी ही पिढी म्हणजे बांधकाम क्षेत्राची केवळ गरज नव्हे उज्ज्वल भवितव्य आहे." अशा शब्दांत क्रेडाई नॅशनलचे (CREDAI National) अध्यक्ष सतीश मगर (satish magar) यांनी उपस्थित तरुण उद्योजकांना प्रोत्साहित केले. 

क्रेडाई-महाराष्ट्रची एकदिवसीय कॉन्क्लेव्ह (One Day Conference of Credai-Maharashtra) नुकतीच येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेसाठी राज्याच्या 62 शहरांतून संस्थेचे 200 हून अधिक सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

यावेळी क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, अनंत राजेगावकर, निमंत्रक अभिषेक भटेवरा, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरडे, निमंत्रक  आशिष पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद खैरनार, सचिव सुनील कोतवाल आणि क्रेडाई पुणे मेट्रोचे नवनिर्वाचित अध्यक्ष रणजित नाईकनवरे देखील उपस्थित होते.

 

पुढे मगर म्हणाले की,”युवा पिढीने बांधकाम क्षेत्रात काम करताना संयम, सचोटी आणि चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा. कोणतेही निर्णय घेताना सर्व नियम, कायदे यांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महिला उद्योजिकांनी बांधकाम क्षेत्राकडेही दीर्घकालीन संधी म्हणून पाहावे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस आशिष पवार यांनी गेल्या दोन वर्षातील युथ विंगच्या कामाचा धावता आढावा घेतला. शांतीलाल कटारिया (shantilal katariya) यांनी 'येत्या काळातील संभाव्य समस्या' यावर तर अनंत राजेगावकर (anant rajegavkar) यांनी पुढील काळातील व्यवसायाच्या संधी' या विषयावर उपस्थितांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

 

रणजित नाईकनवरे (ranjit naiknavare) व प्रमोद खैरनार (pramod khairnar) यांनी देखील अनुक्रमे 'बांधकाम व्यवसायातील संधी' आणि 'सिटी ब्रॅण्डिंग व सामाजिक बांधिलकी' या संबंधी सविस्तर मत मांडले. सुनील फुरडे (sunil furde) यांनी युथ विंगच्या टीमचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. 

डॉ. ऍड हर्षल सावला (harshal sawla) यांनी 'बांधकाम व्यवसायात विपणनाच्या नवीन पद्धती' समजावून सांगितल्या. डॉ. अनिल लांबा (anil lamba) यांनी वित्त विषयक तर श्रावण हर्डीकर (shravan hardikar) यांनी भारतीय प्रशासन सेवेसह नोंदणी व मुद्रांक संस्थेने चालू केलेल्या ई रजिस्ट्रेशन संबंधीच्या कार्यपद्धतीवर तरुणांना मार्गदर्शन केले. रोहित गेरा (rohit gera) यांनी 'बांधकाम व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर' याविषयी उपयुक्त माहिती दिली.

ही सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राच्या वुमन्स विंगच्या निमंत्रक सपना राठी (sapna rathi), उपाध्यक्ष आदित्य जावडेकर (Vice President Aditya Javadekar), सहसचिव धर्मवीर भारती (Joint Secretary Dharamveer Bharti), संकेत तुपे (sanket tupe), कुणाल दुद्दलवार (Kunal Duddalwar), साहिल प्रभाळे (Sahil Prabhale) व दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांनी विशेष परिश्रम घेतले. बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाल्यामुळे तरुण बांधकाम उद्योजकांसाठी ही सभा फलदायी ठरली.

क्रेडाई-महाराष्ट्र ही बांधकाम व्यावसायिकांची राज्यस्तरीय महा संघटना असून, 1994 मध्ये स्थापन झाली आहे. ही संस्था आयएसओ 9001-2015 प्रमाणित असून राज्य शासनासोबत काम करीत असते. फेडरेशन आपल्या सभासदांना नेहमीच मदत करण्यास कटिबद्ध असते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.