पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने व वाहतूक वाकड विभाग पोलीस अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना ईमेलद्वारे तक्रार दिली गेली आहे.
याबाबत रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत अर्जून सरवदे म्हणाले,”पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 25 वाकड मधील दत्त मंदिर रोडच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणावर येणारा जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाकड पोलीस ठाणे आणि वाहतूक वाकड विभागाच्या नियोजन शून्य, ढिसाळ कारभारामुळे वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंग ही गंभीर समस्या बनली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलीस ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत व स्थानिक रहिवाशांसोबत वाहतुकीची समस्या ज्या ठिकाणी आहे, पार्किंगची समस्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते."
“तसेच यासंदर्भात शासकीय कार्यालयामध्ये संयुक्त बैठका घेऊन वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंग यावर तोडगा काढणे अपेक्षित होते. परंतु असे न करता स्थानिक माजी नगरसेवकांच्या कार्यालयात जाऊन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व वाहतूक विभागाचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेणार असतील तर पोलीस ठाणे, शासकीय कार्यालयांना मोठे टाळ ठोकायला हवे आणि सगळा पोलीस खात्याचा कारभार स्थानिक माजी नगरसेवकांच्या कार्यातून चालवला पाहिजे.” असे ते म्हणाले.
“पोलीस प्रशासनाला नागरिकांच्या समस्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने किंवा शासकीय कार्यालय नसल्याने यापुढे पोलीस प्रशासनाचा सर्व कारभार स्थानिक पुढार्यांच्या खाजगी कार्यालयातून होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी, समस्या ऐकून घेण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांच्या कार्यालयात पोलीस तत्परतेने हजर राहणार आहेत. यामुळे आता स्थानिक पोलीस ठाण्यात प्रश्न न सोडवता स्थानिक पुढाऱ्याच्या कार्यालयातूनच सोडवण्यात येतील अशी पाटी वाकड पोलीस ठाण्याच्या बाहेर लावणे एवढेच बाकी राहिले आहे.” अशी पाटी लावण्यासंदर्भात मागणी देखील सुर्यकांत सरवदे यांनी केली.
पुढे ते म्हणाले,”एकीकडे स्थानिक पोलीस अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करतात नागरिकांच्या समस्या तक्रारी ऐकून घेण्यास पोलीस प्रशासनाला वेळ नसतो परंतु स्थानिक माजी नगरसेवकांच्या कार्यालयात जाऊन नियमबाह्य कार्यपद्धती बैठका घेतल्या जातात. समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल अशा प्रकारचे वर्तन का करण्यात येत आहे ? हा प्रश्न इथे उपस्थित होतो.”
“दत्त मंदिर रोडवरील पिंपरी चिंचवड मनपाच्या कामामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे तसेच बेशिस्त पार्किंग हा सुद्धा गंभीर मुद्दा होत आहे. यावर उपाययोजना करणे वाहतूक विभाग पोलीस ठाणे कडून अपेक्षित होते. यासाठी शासकीय कार्यालयात संयुक्त बैठक घेणे शासकीय नियमांना धरून होते. परंतु कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही. कार्यालयीन शिस्त भंग करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने व वाहतूक अधिकारी माजी नगरसेवकांच्या कार्यालयात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतायत हे निषेधार्ह आहे. यातून स्थानिक पुढाऱ्यांचे वर्चस्व पाहायला मिळते. येत्या काळामध्ये नगरसेवक पदाच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत या निवडणुकांच्या अगोदर पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे ही गंभीर बाब आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे आणि स्थानिक पुढाऱ्यांचे हितसंबंधांचा प्रभाव येत्या निवडणुकीवर देखील पाहायला मिळेल असे आम्हास वाटते.” असेही सुर्यकांत सरवदे म्हणाले.
सर्व प्रकार पाहता एकंदरीत पोलीस प्रशासनाच्या कार्यनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर पुढाऱ्यांचा हस्तक्षेप अधिक असल्याचे दिसून येते, असे त्यांचे मत आहे.
“आम्ही आपणाकडे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वाहतूक वाकड विभागाचे पोलीस अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. अशी मागणी करत आहोत. यापुढे असा प्रकार घडू नये म्हणून आपण परिपत्रकाद्वारे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत शासकीय कामकाजा संदर्भात, बैठकांसंदर्भात औपचारिक कार्यक्रमासंदर्भात खासदार, आमदार आणि नगरसेवकांच्या खाजगी कार्यालयामध्ये कोणतेही प्रशासकीय कामकाज होणार नाही. अशी नियमावली जाहीर करावे. उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाईचे प्रावधान असावे.” अशी मागणी ते करत आहे.
सदर प्रकरणाच्या अनुषंगाने वाकड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईबाबत लेखी अवगत करावी आणि त्यांच्या मागण्यांचा योग्य तो कायदेशीर विचार न केल्यास कायदेशीर कृती करण्याचा इशारा रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे यांनी दिला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84