Type Here to Get Search Results !

Dunzo ॲपमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर सामुहिक बलात्कार

 

पुणे, दि. 27 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): Dunzo या ऑनलाईन डिलिव्हरी ॲप (Dunzo delivery app) कंपनीमध्ये नोकरीचे आमिष (lure) दाखवत 26 वर्षीय महिलेवर बलात्कार (rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही घटना कोंढवा परिसरात जुलै 2022 ते ऑगस्ट 2022 दरम्यान घडली. या प्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (complaint) दिली आहे. त्यानुसार आरिफ खान, रवी आणि रियाज अशा 3 जणांविरोधात पोलिसांनी बलात्कार, खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ खानने पीडितेला आपण तिच्या पतीचा मित्र असल्याचे सांगितले. डिलिव्हरी गर्ल (delivery girl) म्हणून काम लावून देतो असे सांगत आरिफने पीडितेला एक डिलिव्हरी करायची सांगत भेटण्यास बोलवून तिला एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर दुसरा आरोपी रवीने फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threatened to viral photo) देत तिच्याकडे 1,00,000 रुपयांची खंडणी मागितली. तर, तिसऱ्या आरोपीने पीडितेला सातत्याने धमकावल्याचे (warning) तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

 

आरोपींच्या जाचाला कंटाळून पीडितेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात वरील तीन आरोपींविरोधात भारतीय दंडात्मक कलम 376(2), 506, 384, 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes       

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.