पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील मालमत्तांवर कारवाई केली गेली. यासोबतच त्यांच्या निकटवर्तीयांवरही सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी (दि. 11 जानेवारी 2023) कारवाई केली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात सकाळी 7:30 ते 11:30 यादरम्यान 4 ठिकाणी छापे टाकले. शिवाजीनगर येथील ई स्क्वेअरसमोर, पेट्रोल पंपाच्या मागे एका इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयात छापे टाकून कागदपत्रे जप्त केली.तर दुसरीकडे हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्यूज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक राहतात. ईडीच्या पथकाने त्यांचीही तिथे चौकशी केली.
तसेच, मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार हे साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्क परिसरात राहतात. त्यांच्या घरी छापा टाकून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे एका साखर कारखान्यातील व्यवहारासंदर्भात चौकशी करण्यात आल्याचे समजले. मात्र, याबाबत अधिक तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.
यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,”कोणतीही तपास यंत्रणा चौकशी करीत असल्यास त्यांना संपूर्ण सहकार्य केले जाईल. सरकारने विरोधकांवर कारवाई करण्यासाठी सत्तेच्या गैरवापराची परिसीमा गाठली आहे. सरकारने कटकारस्थान करण्यापेक्षा राज्याचा विकास आणि महागाई कमी करण्याबाबत लक्ष दिल्यास जनतेचे भले होईल.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84