पुणे, दि.11 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): अप्पासाहेब नलवडे साखर कारखानाप्रकरणी राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. कारखानातल्या १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे.
सकाळी 6:30 वाजता अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोहचले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरमधील कागल येथील घरावर ईडीचे छापे पडले. जवळपास २० अधिकारी मुश्रीफांच्या घरी पोहचले आहेत. कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी छापेमारी मारण्यात आल्या. याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर जुलै 2019 मध्ये कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. याबरोबरच आयकर विभागानं त्यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागानं छापा टाकला होता.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84