पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मुलाला लॉटरी लागल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ महिलेला बुलेटवरून कात्रज भागात नेले आणि तिच्या अंगावरील दागिने काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आजी सनसिटी रोड परिसरात राहतात. त्या शुक्रवारी (दि. 6 जानेवारी 2923) सकाळी 9 च्या सुमारास ऑरबीट सोसायटीच्या गेटजवळ उभ्या होत्या. त्यावेळी एक जण बुलेटवरून त्यांच्याजवळ आला. त्याने 'तुमच्या मुलाला अडीच लाखांची लॉटरी लागली आहे. माझे साहेब जवळच उभे आहेत, तुम्ही चला,' असे म्हणून बुलेटवर बसविले आणि त्यांना सन एम्पायर सोसायटीच्या कात्रज मिल्क पार्लरच्या मोकळ्या परिसरात नेले.
त्याठिकाणी त्यांच्या गळ्यातील सोने व हातातील बांगड्या जबरदस्तीने काढून घेण्यास सुरुवात केली. मात्र, आजीने आरडाओरडा केला. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. सतर्क नागरिकांनी हा प्रकार पाहून विचारणा केल्यानंतर त्याने पळ काढला. मात्र, नागरिकांनी सदर इसमाला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
सदर तरुण जखमी असून, त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84