पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नातेवाइकांच्या उपचारासाठी परदेशातून आलेल्या एका महिलेचे दागिने गहाळ झाल्यानंतर काही तासांतच फरासखाना पोलिसांनी त्या महिलेचे 15 तोळे दागिने शोधून तिच्या हवाली केले.
शनिवारी (दि. 7 जानेवारी 2023) सायंकाळी त्यांची 15 तोळ्यांचे दागिने आणि कागदपत्रे असलेली पिशवी गहाळ झाली. महिलेने त्वरित शिवाजी रस्त्यावरील कसबा पेठ पोलीस चौकीत धाव घेतली आणि तक्रार दिली.
उपनिरीक्षक कविता रूपनर यांच्याकडे ती महिला गेल्यानंतर तिची तक्रार ऐकून घेत त्यांनी तिला धीर देत ही बाब वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या कानावर घातली. महिलेने दागिने असलेली पिशवी चोरीला गेल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली होती. पोलिसांनी कसबा पेठ परिसरात त्वरित तपास सुरू केला. रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र, पोलिसांना दागिने असलेली पिशवी सापडली नाही.
शेवटी पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे चित्रीकरण तपासले. त्यात सर्व प्रकार समोर आला. रुग्णालयातील खिडकीतून महिलेच्या लहान मुलानेच ती पिशवी रुग्णालयाच्या तळमजल्यावर टाकल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले. पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर, उपनिरीक्षक राजू पवार, हवालदार सुनील मोरे, शिपाई अनिल गायकवाड, राजाराम गाढवे हे इमारतीच्या तळमजल्यावर गेले. अंधारात राडारोड्यात पिशवी पडली होती. तिचा शोध घेतला. यावेळी दागिनेदेखील राडारोड्यात पडले होते. मोबाइलच्या टॉर्चचा वापर करून दागिने शोधण्यात आले.
पोलिसांनी तत्काळ महिलेला केलेल्या मदतीमुळे तिला तिचे दागिने मिळाल्याने तिने पोलिसांचे आभार मानले आहेत. ऑस्ट्रेलियातील सादो ओमरले यांच्या सात वर्षांच्या मुलाला कसबा पेठेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84