पुणे, दि. 14 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गेल्या
दोन महीन्यांपासून कोबी, फ्लॉवरच्या दरात मोठी घसरण झाली
आहे. कवडीमोल बाजारभावामुळे गुंतविलेले भांडवल तर दूर, परंतु
तोडणी, मजुरी आणि वाहतुकीचा खर्चही वसूल होत नाहीये. यामुळे
कोबी, फ्लॉवर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आहेत.
शेतकरी आता कोबीचा वापर जनावरांना चारा म्हणून करू लागले आहेत.
बाजारात महागाई असताना
शेतकऱ्यांच्या पिकाला मात्र कवडीमोल भाव मिळत आहे. आधी टोमॅटोचे दर घसरले होते आणि
आता कोबी, फ्लॉवर या फळभाजी पिकांच्या बाजारभावात झालेली
घसरण कायम आहे. शेतकर्यांनी ही पिके सोडून दिली. अनेक शेतकऱ्यांनी कोबी
फ्लॉवरच्या उभ्या पिकांमध्ये जनावरे सोडली आहेत.
राजस्थानी गोपालक देखील बैलगाडी, ट्रॅक्टर
ट्रॉलीत कोबी आणि फ्लॉवरचे गड्डे भरून नेऊन जनावरांना खाऊ घालताना दिसत आहेत.
बाजारभाव घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर मेंढपाळ, गोपालकांची
चंगळ झाली आहे. काही शेतकर्यांनी कोबी फ्लॉवर दूध देणाऱ्या जनावरांना खाऊ
घालण्यास सुरुवात केली आहे. धनगर मेंढपाळांचे मुक्काम सध्या कोबीच्याच शेतात दिसत
आहेत.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84