पुणे, दि. 13 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शहरात सलग चौथ्या दिवशी पारा 10 अंशांच्या खाली कायम आहे. त्यात पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शहरात थंडीचा कडाका तूर्तास असाच जाणवणार आहे.
गुरुवारी (दि. 12 जानेवारी 2023) शहरात 8.3 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले होते. सरासरीपेक्षा तापमानात 3 अंशांनी घट झाली होती. एकूण जिल्ह्यातील स्थिती पाहता पाषाण, एनडीए, हवेली, तळेगाव, शिरूर, लोणावळा, आंबेगाव आणि माळीण येथे ही पारा 8 ते 9 अंशांच्या दरम्यान नोंदला गेला.
राज्यात बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या खाली घसरल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. त्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारठा चांगलाच वाढला आहे. गुरुवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे 5.5 अंश सेल्सिअस इतकी झाली. तर धुळे, पुणे, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद येथे ही पारा 10 अंशांच्या खाली होता.
या जागीही पारा 10 अंशांच्या खालीच आहे -
निफाड – 5.5
धुळे – 6.2
पुणे – 8.3
जळगाव - 7
नाशिक – 9.2
औरंगाबाद – 9.4
राज्यात किमान तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 5 अंशांनी खाली घसरले होते. कोकण वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे शुक्रवारी (दि. 13 जानेवारी 2023) मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात पुढील दोन दिवस थंडीची हुडहुडी कायम राहणार आहे. शनिवारपर्यंत (दि. 14 जनेवारी 2023) शहरात किमान तापमान 9 अंशांच्या दरम्यान असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला असून त्यानंतर तापमानात पुन्हा काहीशी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
पुणे शहरात मागील चार दिवसांपासून पारा सरासरीपेक्षा खालीच दिसून आले.
वार - किमान तापमान (अंश सेल्सिअस)
सोमवार (ता. 9) – 8.6
मंगळवार (ता. 10) – 7.4
बुधवार (ता. 11) – 8.1
गुरुवार (ता. 12) – 8.3
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84