पुणे, दि. 7 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक कुमार संघकारा यांच्यावर हिंजवडीच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
संघकारा यांचे भारत-श्रीलंका सामन्याच्या एक दिवस आधी 4 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी अंग थरथर कापत असल्याने त्यांना संध्याकाळी 8 वाजता हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. संघकारा यांना थंडी वाजून येणे, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह आणि ताप आला होता. तसेच त्यांच्या अंगातील पाण्याचे प्रमाणही कमी झालेले होते. ताप तर 103 डिग्री सेल्सिअस होता.
त्यांच्यावर डिहायड्रेशन आणि तापावर उपचार करण्यात आले. त्यांना गुरूवारी सामन्यांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला. संघकारा म्हणाले की,”रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वांनी उत्तम काळजी घेतली.”
त्यांच्यावर उपचार करणारे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीधर देशमुख म्हणाले की “आम्ही संघकारांना दवाखान्यात दाखल करून घेतले आणि त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण पुर्ववत केले. सोबत इतर सहाय्यक उपचार दिले गेले आणि ते विषाणूजन्य डिहायड्रेशन आजारातून लवकर बरे झाले.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84