Type Here to Get Search Results !

कात्रजचे मनसे’चे इंजिन पुन्हा धावणार; धावती फुलराणी पाहून लहान मुलं पुन्हा खुश होणार

 

पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राजकीय अनास्थेमुळे गेल्या 5 वर्षांपासून बंद असलेली कात्रज उद्यानातील फुलराणी लवकरच सुरू होणार आहे.

महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर कारभार प्रशासकांच्या हाती आला. त्यानंतर आता फुलराणी सुरू करण्यासाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. फुलराणी पुन्हा सुरू करण्यासाठी वसंत मोरे यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आता फुलराणीची कामे सुरू झाली आहेत. येत्या २६ जानेवारी 2023 पासून फुलराणी सुरू करण्याचा निर्धार वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, तसेच तेथील तलावात उभारण्यात आलेला श्री शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, संगीत कारंजे, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा पाटलांचा वाडा, शिवाजीराजांच्या जीवनचरित्राची ओळख करून देणारे आगळे ग्रंथसंग्रहालय ही विविध आकर्षणे ठरत असतानाच बालगोपाळांसाठीची फुलराणी बालगोपाळांचे नवे आकर्षण ठरली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज येथील आजी-आजोबा उद्यानात फुलराणी सुरू केली होती. फुलराणी सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच वर्षी फुलराणीतून वार्षिक तब्बल २९ लाखांचे विक्रमी उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले होते.

सन 2017 च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आली. त्यानुसार वसंत मोरे यांचा प्रभाग बदलला गेला. त्यानंतर कात्रज उद्यानातील बालगोपाळांचे प्रमुख आकर्षण असलेली फुलराणीकडे दुर्लक्ष झाले. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसेकडून सातत्याने आंदोलने करण्यात आली होती. फुलराणीच्या रुळांची दुरवस्था झाली. त्यामुळे, फुलराणी बंद पडली.

परंतु आता फुलराणीच्या कामांसाठी वेहिकल डेपो विभागाने कामे सुरू केली आहेत. या कामांना प्रारंभ झाला आहे. सध्या रुळाची कामे सुरू असून, 25 जानेवारी 2023 पर्यंत कामे पूर्ण होतील, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

फुलराणी सुरू होणार असल्याची माहिती मोरे यांनी समाजमाध्यमातूनही जाहीर केली आहे. राजकीय अनास्थेमुळे कात्रज उद्यानातील तिरंगा फडकणे बंद झाले आहे. फुलराणीही बंद ठेवण्यात आली होती. उद्यानातील कारंजेही सुरू करण्यासंदर्भात सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.