Type Here to Get Search Results !

‘जी २०’तील सहभागी देशांचे प्रतिनिधी पुण्यात दाखल महापालिका अधिकाऱ्यांकडून स्वागत

 

पुणे, दि. 16 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडणारी यंदाच्या जी 20’ परिषदेतील (G-20 Summit 2023 India Presidency) महत्त्वाची बैठक सोमवारी (ता. 16 जानेवारी 2023) व मंगळवारी (ता. 17 जानेवारी 2023) पुण्यात होत आहे. ही बैठक योग्य पद्धतीने पार पडावी, यासाठी पुणे महापालिकेकडून मागील महिनाभरापासून स्वच्छता, सुशोभीकरण, सादरीकरणाबरोबरच विविध टप्प्यांवर मोठ्या प्रमाणात काम केले जात होते.

 

तब्बल एक महिन्यापासून सुरू असलेली जी 20 परिषदेअंतर्गत (G-20 Summit in pune)  होणाऱ्या बैठकीच्या तयारीची लगबग रविवारी पूर्ण झाली. दरम्यान, विविध देशांच्या प्रतिनिधींच्या सुरक्षिततेसाठी शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

दरम्यान, या बैठकीसाठी शनिवारपासून विविध देशांचे प्रतिनिधी पुण्यात दाखल होण्यास सुरुवात झाली. शनिवारी 20 तर रविवारी 40 हून अधिक प्रतिनिधी पुण्यात दाखल झाले. त्यांचे लोहगाव विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते सेनापती बापट रस्त्यावरील मेरिएट हॉटेलमध्ये दाखल झाले. शनिवारी व रविवारी पुण्यात दाखल झालेल्या बहुतांश देशांच्या प्रतिनिधींचे रविवारी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तर केंद्र सरकारने पाहुण्यांसाठी रविवारी रात्री खास वेलकम डिनरठेवत त्यांच्या पाहुणचाराला सुरुवात केली.

 

दरम्यान, राज्य सरकारकडून परिषदेच्या ठिकाणी 5 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. तर पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या वृक्षारोपणाची रंगीत तालीम रविवारी घेण्यात आली. याबरोबरच त्यांचे स्वागत व सांस्कृतिक कार्यक्रमांचीदेखील रंगीत तालीम घेतली.

 

जी 20’ परिषदेअंतर्गतच्या बैठकीनिमित्त येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षिततेत कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये, यादृष्टीने पुणे पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने पोलिसांकडून यापूर्वीच परिषदेच्या ठिकाणाची कसून तपासणी करण्याबरोबरच मॉक ड्रिलही घेतले. तसेच सोमवारी व मंगळवारी मेरिएट हॉटेलच्या परिसरात 100 ते 150 पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

 

परदेशी पाहुण्यांच्या स्वागत व उद्‌घाटनप्रसंगी महापालिका प्रशासनाकडून खास सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळाया संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. याबरोबरच महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडविणारे कार्यक्रमही या वेळी पाहुण्यांसमोर सादर केले जाणार आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com     

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.