पुणे, दि. 17 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): यंदाच्या जी 20 परिषदेचे (G20 summit pune) अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे परिषदेच्या बैठका (G20 meetings देशात होत आहे. देशातील शहरांचा विकास कसा करता येईल, शहरीकरणामुळे झालेल्या समस्यांवर उपाययोजना शोधणे, शहरे विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरून निधी जमा करणे, शाश्वत जीवनशैलीकडे अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. (urban development, solutions to problems occurring due to urbanization and similar topics will be discussed in G20 meeting)
शहरीकरणासह जागतिक पर्यावरणाचा ऱ्हास, कोवीड सारखी संकटे आली तर काय करावे यांसह तसेच शहरांचा आर्थिक विकास, शहर व ग्रामीण भागातील दरी, नागरिकांचे दरडोई उत्पन्न यावर आज (दि. 17 जानेवारी 2023) चर्चा होणार आहे. जी-20 च्या सदस्य देशांतून आलेले 66 प्रतिनिधी त्यात सहभागी होतील.
जी 20 च्या माध्यमातून भारतात परदेशी गुंतवणूक वाढावी, यासाठी सहभागी प्रतिनिधी मंडळा समोर केंद्र सरकारतर्फे सादरीकरण होणार आहे. यात विविध योजनांची माहिती दिली जाईल. तसेच देशातील यशस्वी प्रकल्पाची देखील माहिती सांगण्यात येईल. यावेळी पायाभूत सुविधा, गुंतवणूक, रोजगार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
दुपारी 1 ते 3 दरम्यान 'शहरीकरण' या विषयावर परिसंवाद होईल. त्यातील पायाभूत सुविधांची बैठक शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सुरु आहे. त्यानंतर दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले विद्यापीठात जगभरातून आलेल्या पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीचा समारोप झाल्यावर पुणे शहराचे दर्शन घडविले जाईल.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84