पुणे, दि. 17 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): G20 परिषदेच्या निमित्ताने 35 देशातील राजदूत हे सध्या पुण्यात आहेत. जी 20 परिषदेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप (IWG) ची दोन दिवसीय बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज पुणे विद्यापीठात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे विद्यापीठातील याच कार्यक्रमात पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी ढोल ताशा आणि लेझीम पथक लावण्यात आलं होतं. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला.
हे पाहुणे ढोल पथकासोबत ढोल ताशा वाजवताना आणि लेझीम खेळताना पहायला मिळाले. या कार्यक्रमात परदेशी पाहुण्यांना देखील आपल्या भारतीय ढोल ताशाची आणि लेझीमची भुरळ पडलेली पाहायला मिळाली. ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली. यासोबतच शिव वंदना, शिवराज्याभिषेक गीत देखील यावेळी सादर करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे महानरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84