पुणे, दि. 20 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): जी 20 परिषद संपली म्हणून पुन्हा शहराचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी वेळीच्या वेळी स्वच्छता करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. तसेच जे नागरिक रस्त्यावर थुंकून घाण करणार आहेत, त्यांच्यावरची कारवाईही बंद होणार नाही, असेही सांगितले आहे. (PMC ordered to clean the city so that cleanliness will not be ignored even if G20 conference is over and also to take action against those citizens who are spitting on streets.)
गेल्या 8 दिवसात 353 जणांवर कारवाई करून 3,53,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. जी 20 च्या बैठकीसाठी परदेशातील उच्चपदस्थ अधिकारी येणार त्यामुळे शहर स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर होते.
महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, केंद्र शासनातील अधिकाऱ्यांनी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील जे. एल्ब्यू. मेरिएट हॉटेल दरम्यान अनेकदा पाहणी केली. खड्डे बुजविणे, पादचारी मार्ग दुरुस्त करणे, राडारोडा कचरा उचलणे यासह रंगरंगोटीकडे लक्ष देण्यात आले होते.
पण महापालिकेने स्वच्छता केल्यानंतर बेशिस्त नागरिक रस्ते, पादचारी मार्ग, दुभाजकावर पान, गुटखा खाऊन थुंकून घाण करत आहेत. हे प्रकार थांबत नसल्याने प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात कली होती. नागरिकांना रंगेहाथ पकडून 1000 रुपयांचा दंड वसूल केला. पैसे नसतील तर त्यांना स्वतःला रस्ता स्वच्छ करण्यास भाग पाडले होते.
याबाबत घनकचरा विभागच्या उपायुक्त आशा राऊत म्हणाल्या,“जी 20 परिषद झाली तरीही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची कारवाई सुरू राहणार आहे. बुधवारी 26 जणांकडून 26,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर 10 ते 18 जानेवारी या कालावधीत 353 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 3,53,000 रुपये दंड वसूल केला आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी घाण करून शहर अस्वच्छ करू नये.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84