Type Here to Get Search Results !

MNGL चा गॅस नको रे बाबा, आपला जुना गॅस सिलेंडरच बरा; पुण्यात तब्बल १५ तास पुरवठा होता बंद

 

पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्ता परिसरात बारा तासांहून अधिक काळ एमएनजीएलचा (MNGL) गॅसपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मंगळवारी रात्री 8:15 ते 8:30 च्या दरम्यान पुरवठा बंद झाल्याने रहिवाश्यांची गैरसोय झाली.

एमएनजीएलच्या युनिटमध्ये बिघाड झाल्याने सिंहगड रस्त्याची उजवी बाजू तसेच माणिक बागेच्या भागातील पुरवठा बंद पडला. यात साई विराट, सन ओरा, सन एम्पायर, सनसिटी, यासह आनंदनगर आणि माणिकबाग भागातील सर्व मोठ्या सोसायट्यांचा समावेश आहे. या भागातील पुरवठा बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती.

याबाबत सनसिटी येथील रहिवासी प्रिया कडू आणि ऋतुजा अंकुलकर म्हणाल्या,”रात्रीच्या जेवणाच्या वेळेस गॅस बंद झाला. त्यात अंगारक चतुर्थीचा उपवास होता; त्यामुळे स्वयंपाक सुरू होता, तो अर्धवट राहिल्याने गैरसोय झाली.” तसेच साई विराटमधील मेधा सुतार, सन एम्पायरमधील स्वाती जांभेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस पुरवठा अचानक बंद झाल्याने तारांबळ उडाली. जेवण बाहेरून मागवण्याची वेळ आली.

तसेच “एमएनजीएलने अशी घटना घडल्यावर नागरिकांना मोबाईलवर संदेश द्यायला हवा होता. तसेच हा पुरवठा पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत कुठलीही माहिती दिली गेली नव्हती. त्यामुळे गॅस पुरवठा किती वेळात सुरू होईल, याची माहिती मेसेजच्या माध्यमातून देण्यात यावी,” अशीही मागणीही त्यांनी केली.

गॅस पुरवठा सुरळीत होण्यासंदर्भात एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना विचारले असता बिघाड शोध सुरू असून, त्यावर उपाययोजना लवकरच करण्यात येत आहेत. दोन तासांत पुरवठा सुरळीत होईल, यासाठी काम सुरू आहे, अशी माहिती नागरिकांना देण्यात येत होती.

मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत गॅस पुरवठा पूर्णतः सुरू झाला नव्हता. काही भागात गॅस पुरवठा सुरू झाला तर काही भागात तांत्रिक अडचणी उद्भवल्याने गॅस पुरवठा सुरू झाला नव्हता.

दुपारी 12 च्या सुमारास हा गॅस पुरवठा सुरू झाला. दरम्यान आनंदनगर भागात असलेल्या सर्व स्नॅक सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांकडे रांगा होत्या. नागरिकांनी तयार खाद्यपदार्थ मागवून भूक भागवली. किमान नऊ ते साडेनऊ हजार ग्राहक सिंहगड रस्त्याला जोडले गेले आहेत. गॅस पुरवठा बंद असल्याने या सर्व नागरिकांच्या घरात गैरसोय झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यासाठी कात्रज आणि कोथरूड या भागातून मुख्य गॅस वाहिन्या येतात. राजाराम पूल परिसरात सुरू असलेल्या खोदकामात कोथरूडकडून येणारी वाहिनी नादुरुस्त झाली. परिणामी सिंहगड रस्ता भागात पुरवठा खंडित झाला.

आपुलकी संस्थेच्या अध्यक्ष प्राजक्ता रूपदे म्हणाल्या,”एमएनजीएलच्या वतीने गॅस पुरविला जातो. मात्र त्यानंतरची देखभाल-दुरुस्ती यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. यासोबतच जनसंपर्क म्हणून यंत्रणा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.”

सिंहगड रस्त्याला गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्व आनंदनगर परिसरात सर्वप्रथम सुरू झाले; मात्र अद्यापही या भागातील नागरिकांना गॅस जोडणी दिलेली नाही. केवळ पाइपलाइन टाकण्याची कामे करण्यात आली. मात्र त्यातून गॅस नागरिकांच्या घरात पोहोचलेला नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कोणतेही ठोस उत्तर नागरिकांना मिळालेले नाही.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.