Type Here to Get Search Results !

कुचीपुडी नृत्य सादरीकरणाला चांगला प्रतिसाद !

 


पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित कुचीपुडी या एकल नृत्य कार्यक्रमाला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. शनीवार, ७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हे नृत्य सादरीकरण झाले. ‘परिमल परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्च सेंटर’च्या प्रस्तुत कार्यक्रमात कासी आयसोला (अमेरिका) यांनी बहारदार एकल नृत्य सादर केले.

हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४९ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कासी आयसोला यांचा सत्कार केला.

कासी यांनी पारंपारिक रचनांवर नृत्य प्रस्तुती केली आणि रसिक भारावून गेले.'जयमू, जयमू'... या नटराज नृत्याने प्रारंभ झाला. हंस ध्वनी रागाच्या संगीत पार्श्वभूमीवर हे बहारदार नृत्य सादर झाले. कालीया नागावरील 'तरंगम्' कृष्ण नृत्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जावली नृत्य, गोपी संवाद, आणि तिल्लाना सादर करुन त्यांनी मने जिंकली. डॉ. परिमल फडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.