पुणे, दि. 2 जानेवारी 2023
(चेकमेट टाईम्स): केंद्र शासनाने 1 जानेवारी 2023
पासून सर्व
वाहनांना एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बंधनकारक केली
आहे. मात्र, यासंदर्भातील आदेश शनिवार आणि रविवार विकेंडमुळे पुणे आरटीओला आलेले
नाहीत. त्यामुळे वाहनांवर कारवाई होणार की नाही, याबाबत संभ्रमाची
स्थिती आहे.
केंद्र शासनाने या नंबरप्लेट सक्तीच्या केला असल्याचा आदेश
काढला आहे. परंतु, याबाबत महाराष्ट्र राज्यात अशी कारवाई सुरू झालेली नाही. त्यामुळे हा आदेश
राज्यासह शहरात लागू होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले
नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
आता जुन्या वाहनांना केंद्र शासनाने हाय सिक्युरिटी
नंबरप्लेट बंधनकारक केली आहे. वाहनाला ही नंबर प्लेट नसेल, तर संबंधित
वाहनचालकाला 5 ते 10 हजार पये दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी धास्ती
घेतली आहे.
शनिवार आणि रविवार विकेंडमुळे यासंदर्भातील आदेश पुणे
आरटीओला आले आहेत की नाही,
हे अद्याप समजलेले नाही. परंतु, जर असे आदेश
पुणे आरटीओला आले असतील तर पुणेकरांना आपल्या गाड्यांच्या जुन्या नंबर प्लेट
बदलाव्या लागणार आहेत. दुचाकी वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायची असेल तर
356 रूपये तर चारचाकी वाहनांना 600 ते 1100 रूपयांपर्यंत खर्च येणार आहे.
दोन-तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने नव्या वाहनांना हाय
सिक्युरिटी नंबरप्लेट सक्तीची केली होती. त्यानुसार नवे प्रत्येक वाहन शोरूममधून
बाहेर पडले की, हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावूनच बाहेर पडत आहे. मात्र, जुन्या वाहनांना या नंबर प्लेट बंधनकारक नव्हत्या. त्या नुकत्याच केंद्र
शासनाने बंधनकारक केल्या आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84