पुणे, दि.10 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणेकर केव्हा काय करतील याचा काही नेम नाही. या गोष्टीचा फटका पुणे महानगर पालिकेलाही बसला आहे. ऐरवी लोकांच्या छोट्या छोट्या चुकांबाबतही दंड आकारणाऱ्या महानगर पालिकेला चक्क एका सोसायटीनेच तब्बल 16 लाखांचं बिल पाठवलं आहे. याकारणाने सोसायटीकडून आलेले बिल पाहून पुणे महापालिकेनेही नरमाईची भूमिका घेतली आहे.
सरकारी जागेवर बेकायदा जाहिराती लावल्याबद्दल किंवा खासगी मिळकतींवर विनापरवाना रंगरंगोटी केली तर, महापालिका लगेच कारवाई करते. पण हीच चूक महानगर पालिकेने केली तर? महापालिकेला सोडतील ते पुणेकर कसले. याचाच प्रत्यय पुण्याच्या कोथरुड परिसरात आला आहे.
सोसायटीचं कपाऊंड जाहिरातींसाठी बेकायदा पद्धतीने रंगववले म्हणून कोथरूडमधील स्वप्नशिल्प या सोसायटीने महापालिकेला तब्बल 16 लाख रुपयांचे बिल पाठवले आहे. या प्रकरणाची सध्या पुण्यात आणि सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगली आहे.
शहरात जी-20 च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रंगरंगोटी सुरु आहे. शहरात सुशोभीकरण देखील करण्यात येत आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात स्वप्नशिल्प सोसायटी आहे. या सोसायटीच्या कपाऊंडवर पुणे महापालिका गेल्या काही वर्षांपासून जाहिराती रंगवते. शहरातील भिंतीवर विनापरवाना आणि बेकायदा रंगरंगोटी केल्यास कारवाई करणार असल्याचं महापालिकेने यापूर्वी स्पष्ट केलं आहे.
याच गोष्टीची दखल घेत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. महानगरपालिका आपल्या सोसायटीच्या वॉल कपाऊंडवर गेली काही वर्षे विनापरवाना जाहिराती रंगवत असल्याबद्दल काही तरी कार्यवाही केली पाहिजे, असं त्यांचं या बैठकीत ठरलं.
त्यानुसार स्वप्नशिल्प सोसायटीचे अध्यक्ष दिलीप देशपांडे यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना पत्र पाठविले. आमच्या सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता महापालिका वॉल कपाऊंडचं रंगकाम करते. यामुळे आकाशचिन्ह विभागाच्या दरानुसार महापालिकेने बिलापोटी आम्हाला 16 लाख रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे महापालिकेकडे केली. पुढे त्यानुसार ते आयुक्तांना भेटले. आयुक्तांनी देखील आलेल्या या तक्रारीची दखल घेतली.
यानंतर नरमलेल्या महापालिकेने सोसायटीचे कपाऊंड पूर्ववत करून देण्याचे लेखी आश्वासन दिले आणि झालेली चूकही मान्य केली. मात्र, झालेल्या या प्रकारामुळे शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84