Type Here to Get Search Results !

पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही होणार!

 

पुणे, दि. 13 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शहरात सध्या अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात महापालिकेची मुदत संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रोचे उद्‍घाटन, नदी काठ सुधार, जायका या प्रकल्पांचे भूमिपूजन झाले. पण त्यानंतर महापालिकेवर प्रशासक आल्याने असे मोठे कार्यक्रम झाले नव्हते.

महापालिकेत राजकीय पक्ष सत्तेत असल्यानंतर प्रकल्पांचे उद्‍घाटन, भूमिपूजन धूमधडाक्यात होतात. पण गेल्या 10 महिन्यांपासून प्रशासकराज असताना प्रथमच 232 कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांचे उद्‍घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 14 जानेवारी 2023) होत आहे.

गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेले काही प्रकल्प पूर्ण झाल्याने त्यांच्या उद्‍घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी तीन वाजता येरवड्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक रंगमंदिर येथे होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्यासह विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व स्थानिक खासदार, आमदारांना निमंत्रित केले आहे.

गेल्या काही महिन्यात प्रशासनाने मोठे निर्णय घेतले. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत 110 कोटी, जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे रुंदीकरण आणि बीआरटीचे भूमिपूजन 68 कोटी, बावधन बुद्रूक गावातील समान पाणी पुरवठा योजना 22 कोटी तीन कामांचे भूमिपूजन होणार आहे. तर गोल्फ क्लब चौकात 32 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपुलाचे उद्‍घाटन होणार आहे.

या कार्यक्रमात मुठा नदीवरील कर्वेनगर-सनसिटी या पुलाचे भूमिपूजन आणि शिवणे ते खराडी रस्त्यातील 6 किलोमीटरच्या कामाचा टप्पा या दोन प्रकल्पांचाही समावेस होता. परंतु  कर्वेनगर-सनसिटी या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे आर्थिक प्रश्‍न निर्माण झाल्याने हे काम सुरू होण्यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला तर, खराडी- शिवणे 6 किलोमीटरच्या टप्प्याचेही तांत्रिक अडचणीमुळे उद्‍घाटन होणार नाही. या कारणांमुळे हे 2 प्रकल्प वगळण्यात आले आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com    

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.