पुणे, दि. 2 जानेवारी 2023
(चेकमेट टाईम्स): अभिनेत्री केतकी चितळे ही
सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या वक्तव्यांमुळे ती
अनेकदा अडचणीत येताना दिसते असते.
गेल्यावर्षी केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद
पवार यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे ४१ दिवस
तुरुंगात होती. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात
अनेक कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
अटक झाल्यानंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. तिने
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्येही तिच्यासह घडलेला प्रकार बेकायदेशीर
होता असे म्हटले आहे. तरी अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तुरुंगातून बाहेर
आल्यावर केतकीने 'जय हिंद, जय महाराष्ट्र' अशी
घोषणा दिली होती.
आता केतकी चितळेने तिच्या हातावर याबद्दलचा एक टॅटू
गोंदवून घेतला आहे. त्यामुळे तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
केतकी चितळेने नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केलं. याचा एक
व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत ती "माफ करा पण
कधीही विसरू नका. हॅप्पी न्यू इयर" असं म्हणत दारु पिताना दिसत आहे. या
व्हिडीओत केतकी चितळेने हातावर एक टॅटू काढल्याचे दिसत आहे. यात ‘186/22’ असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असं लिहिलं
की, "मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह
नहीं की बाकी सब १००% गलत है।"
हा पहा केतकी चितळेचा तो व्हिडिओ:
https://www.instagram.com/reel/Cm16snXApaR/?utm_source=ig_web_copy_link
यानंतर आता तिने तिच्या या टॅटूचा नेमका अर्थ काय? याबद्दल सांगितले आहे.
तिने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर एका नेटकऱ्याने तिला या टॅटूचा अर्थ विचारला
आहे. तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या या हातावरच्या टॅटूचा नेमका
अर्थ काय? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. त्यावर
तिने याचा अर्थ सांगितला आहे.
“हा टॅटू म्हणजे माझा अंडरट्रायल कैदी नंबर आहे.
ते अंक कैदी नंबरचे आहेत. मी कोणालाही माफ करु शकते. पण विसरु शकत नाही”, असे तिने त्या नेटकऱ्याला उत्तर दिले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84