Type Here to Get Search Results !

गांधीभवन मैदानावर शुक्रवारपासून खादी प्रदर्शन, विक्री

 

पुणे, दि. 5 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघाच्या वतीने गांधीभवन मैदानावर खादी प्रदर्शन, विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन  यांच्या हस्ते ६ जानेवारी रोजी  ११ वाजता  उद्घाटन करण्यात येणार आहे. खादी कापडचे प्रदर्शन व विक्री १५ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

विविध प्रांतातील वेगवेगळ्या दर्जाच्या शुद्ध खादी वस्त्रे, तयार कपडे उपलब्ध करण्यात आली आहेत. नव-नवीन डिझाईन चे शर्ट, गांधी टी- शर्ट, कुर्ता, पायजामा, जॉकेट आहेत. लुंगी, टॉवेल, शर्टिंग व कोटिंग उपलब्ध आहे. साड्यांमध्ये खादी साडी, कोसा साडी प्रदर्शनात आहे. ड्रेस मटेरियल, लेडिज टॉप, रुमाल, बेडशीट, खेस चादरी, स्प्रे-दरी, उलन शॉल, कोसा शॉल व लेडीज बॅग यांचा समावेश या प्रदर्शनात आहे. सुती खादी वर २० टक्के सूट तर कोसा कापड वर १५ टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सर्वोदय मंडळाचे अॅड. संतोष म्हस्के,  किशोर  फुलंबरकर  इत्यादी मान्यवर उद्घाटन प्रसंगी  उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ७८७५०८६४१८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.