पुणे, दि. 14 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कोरेगाव
पार्कमध्ये गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगार अजय काळुराम
साळुंके याच्यासह सहाजणांवर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पूर्ववैमनस्यातून हवेत
गोळीबार करुन दहशत माजवून एकाला मारहाण केली गेली. त्यानंतर त्याच्या डोक्यात
सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारुन खुनाचा प्रयत्न केला होता. हा प्रकार मागील 24 नोव्हेंबर 2022 रोजी कोरेगाव पार्कमधील गेरा लिजंट
सोसायटीच्या पार्किंगमध्ये आणि योगी पार्क सोसायटीसमोर घडला होता.
याप्रकरणी सहाजणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात
सहाजणांवर आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात
आली आहे. अजय काळुराम साळुंके ऊर्फ धार अज्या (वय 23), नितीन
ऊर्फ नट्टा मोहन म्हस्के (वय 32), संतोष
सिद्धार्थ चव्हाण (वय 27), अजय ऊर्फ
सोन्या गिरीप्पा दोडमणी (वय 26), नटी
ऊर्फ रोहन ऊर्फ ऋषीकेश मोहन निगडे (वय 28, सर्व रा. ताडीवाला
रोड, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. तर, अन्य एकजण फरार आहे.
अजय साळुंके हा टोळीप्रमुख असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि गंभीर
दुखापत असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. नितीन ऊर्फ नट्टा मोहन म्हस्के याच्यावर
खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे
तीन गुन्हे दाखल आहेत. ऋषिकेश निगडे याच्याविरुद्ध दरोडा आणि गर्दी मारामारीचे दोन
गुन्हे दाखल आहेत. या आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र,
त्यांनी बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगून गुन्हेगारी सुरुच ठेवली
होती.
दाखल गुन्ह्यामध्ये आरोपींविरुध्द मोक्का दाखल
करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ यांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना
पाटील यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला होता.
या प्रकरणाची छाननी करुन या टोळीविरुद्ध मोक्का
कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा बडगा
उगारला असून, त्यांनी
आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ही मोक्का कायद्यानुसार तिसरी कारवाई आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84